अरे वा! नव्या वर्षात म्हाडाची 1600 घरांसाठी लॉटरी; जानेवारीत होणार जाहिरात प्रसिद्ध, पहा कुठे असणार घरे?

मुंबई : येत्या नव्या वर्षात हक्काचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाने येत्या नवीन वर्षात 1600 घरांची लॉटरी (Mhada Lottery) काढण्याचा निर्णय घेतल्याने नवीन वर्षात नव्या घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे येत्या जानेवारी महिन्यातच या घरांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाची घरे (Mhada Flats) परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने अनेकांना म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असतो, पण अनेकांना म्हाडाच्या लॉटरीची माहितीच मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे म्हाडाचे स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणून याठिकाणी आपण नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात प्रसिद्ध होत असलेल्या लॉटरीच्या जाहिरातीत कुठे किती घरे असणार? याची माहिती पाहणार आहोत.

म्हाडा लॉटरी संदर्भात जेव्हा आपण ऐकतो तेव्हा म्हाडाचे घर (Mhada Flat) घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव सुरु करतो. कारण म्हाडा लॉटरी म्हणजे घर घेण्याची एक संधी असते. त्यामुळे ही संधी आपण गमावू नये म्हणून प्रतेक जण प्रयत्न करत असतो. चला तर मग नव्या वर्षात प्रसिद्ध होणार्‍या जाहिरातीत कुठे किती घरे आहे? हे पाहूया..

काय सांगता! आता मुंबईतील या 30 हजार लोकांना मिळणार म्हाडाची घरे, येथे क्लिक करून पहा बातमी..

नव्या वर्षात याठिकाणी म्हाडाची 1600 घरांसाठी लॉटरी (Mhada Lottery)

म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाकडून येत्या नवीन वर्षामध्ये छत्रपती संभाजी नगरमधील 1 हजार 150 एवढ्या घरांसाठी सोडत (Mhada Lottery) काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या सोडतीकरिता जानेवारी महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच नागपूर मधील अंदाजे 450 एवढ्या घरांसाठी देखील जानेवारी महिन्यामध्ये सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. असे एकूण 1600 घरांची लॉटरीची जाहिरात जानेवारीमध्ये येणार आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

अलीकडेच मुंबई- पुण्यामधील घरांसाठी सोडत पार पडली आहे आणि आता या सोडतीमधील घरांची ताबा प्रक्रिया (Possession of houses) सुरु आहे. तर कोकण मंडळामधील 5 हजार 311 घरांपैकी 2 हजार 970 एवढ्या घरांसाठीची सोडतपूर्व असलेली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता लवकरच या सोडतीसाठी नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे. आता नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर या मंडळांकडील उपलब्ध असलेल्या घरांसाठी लवकरात लवकर म्हणजेच जानेवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून संबंधित मंडळांना देण्यात आले आहेत.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

1 thought on “अरे वा! नव्या वर्षात म्हाडाची 1600 घरांसाठी लॉटरी; जानेवारीत होणार जाहिरात प्रसिद्ध, पहा कुठे असणार घरे?”

Leave a Comment