आता घ्या म्हाडाचे स्वस्त घर; आजपासून करता येणार अर्ज, पहा कशी असणार अर्ज प्रक्रिया?

Mhada Flat Scheme : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे (Thane), पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथे गृहनिर्माण योजनेत (Housing Scheme) बांधण्यात आलेल्या 5311 एवढ्या घरांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी आणि अर्जभरणा प्रक्रिया आजपासून (15 सप्टेंबरपासून) सुरू होत आहे. याकरिता ‘गो लाइव्ह’ कार्यक्रम सकाळी 10.30 वाजेला आयोजित करण्यात आला आहे. आणि त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी म्हाडाच्या वांद्रे पूर्वेमधील मुख्यालयामध्ये सकाळी 11 वाजेला संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

Mhada Flat Scheme

कोकण मंडळाच्या घरांच्या सोडत प्रक्रियेमध्ये (Mhada Konkan Lottery 2023) अर्जदाराला कुठूनही भाग घेता येईल. नोंदणीकरण आणि कागदपत्रे (Ducuments) अपलोड करणे तसेच ऑनलाइन पेमेंट यासारख्या सुविधा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे. त्याकरिता Mhada Housing Lottery System हे ॲप उपलब्ध आहे. तसेच अर्जदारांच्या सुविधेसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्जनोंदणी प्रक्रिया उपलब्ध असून यावर अर्जदार नोंदणी करू शकतो. अर्ज करणार्‍यांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनिचित्रफिती आणि हेल्प फाइल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

कोकण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या सोडतीची लिंक 16 ऑक्टोबर रोजी रात्री 11.59 पर्यंत सुरू असणार आहे. आणि अर्जदारांना 18 ऑक्टोबर रात्री 11.59 पर्यंत अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. तसेच 18 ऑक्टोबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस (RTGS), एनईएफटीद्वारे (NEFT) हा भरणा करता येईल. जे अर्जदार सर्व कागदपत्रांची पूर्तता करतील तेच या प्रणालीच्या माध्यमातून पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र असलेल्या अर्जांची अंतिम यादी 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आता मोठी संधी! स्वस्तात घ्या म्हाडाचे घर; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीवर अर्जदारांना 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन हरकती नोंदवता येता येणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पात्र अर्जांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर अर्ज करणार्‍यांना सोडतीचा निकाल तत्काळ त्यांच्या मोबाइलवर एसएमएस, ई-मेल आणि ॲपद्वारे प्राप्त होईल. तसेच त्याच रोजी सायंकाळपासून यशस्वी अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

प्रधानमंत्री आवासचे 1010 घरे

म्हाडाच्या कोकण मंडळ सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची 1 हजार 10 घरे, एकात्मिक गृहनिर्माण योजनेची 1 हजार 37, सर्वसमावेशक योजनेची 919 घरे, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी 67 घरे आणि कोंकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विखुरलेल्या 2 हजार 278 घरे उपलब्ध आहेत. या योजनेमधील शेवटचे घर जो पर्यंत विकले जात नाही तो पर्यंत नोंदणीकरण आणि अर्जभरणा प्रक्रिया सुरू राहणार आहे. अर्जदारांना येणार्‍या अडचणींचे निराकरण करण्यासाठी 022- 69468100 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Leave a Comment