नवी मुंबई : मागील तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा दसरा सन रियल इस्टेट (Real Estate Mumbai) क्षेत्रासाठी चांगला गेला. यंदा दसरा सणाच्या मुहूर्तावर घर विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचं विकासक सांगत आहेत. त्यामुळे आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली दिवाळी सुद्धा भरभराटीची जाणार, असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात नवी मुंबई शहरामध्ये (navi mumbai 2 bhk flat) मोकळ्या भूखंडांचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नवी मुंबईत भूखंडांचे (plot in Navi Mumbai) दर वाढल्यामूळे घरांच्या किमती देखील आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
यातच गेल्या 4 वर्षांमध्ये सिडकोकडून (Cidco) वेगवेगळ्या घटकांसाठी जवळपास 30 हजार एवढ्या घरांची निर्मिती केली आहे. खासगी विकासकांकडून देखील प्रचंड प्रमाणात घरे बांधण्यात येत आहेत. दरम्यानच्या काळात घरांच्या निर्मितीपेक्षा मागणी कमी पडल्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमधील शेकडो घरे ग्राहक मिळत नसल्याने पडून आहेत. अशी परिस्थिती असली तरी मोठ्या आकाराच्या घरांना आणि भरपूर सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या लक्झरी घरांना (Luxury Flats in Navi Mumbai) आज देखील खूप मागणी असल्याचं दिसून येतं.
खुशखबर! आता घ्या चॉईस फॉर्म भरून पाहिजे तिथे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..
फ्लॅटचे कोणत्या भागात किती दर? (Flat rates in Navi Mumbai)
नवी मुंबईचा क्वीन नेकलेस अशी ओळख असलेला नामबीच येथील फ्लॅट सर्वात महाग आहेत. येथील 2 बेडरूमच्या फ्लॅटची किमत जवळपास दीड ते पावणे दोन कोटी रुपये एवढी आहे. (flats at panvel navi mumbai)
खारघर येथे सुविधांयुक्त टू बेडरूम किचनच्या फ्लॅटची (2 bhk Flat in Kharghar) किंमत जवळपास 1 कोटी 30 लाख एवढी आहे. तर वरचा खार अशी ओळख असलेल्या तळोजा विभागामध्ये 70 ते 90 लाखांच्या दरम्यान 2 बेडरूम असलेले घर मिळते.
मुंबईत ऑफर्सचा धमाका! फक्त 10 टक्के रक्कम भरून घेता येणार घर, पहा बातमी..!
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये असलेल्या उलवे नोड या भागात देखील घरांच्या किमती वाढल्या आहेत. या विभागामध्ये 2 रूम किचनच्या फ्लॅटची किंमत जवळपास 70 ते 80 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर वन बीएचके फ्लॅट (1 bhk flat in Navi Mumbai) जवळपास 50 ते 60 लाखांच्या दरात विकण्यात येत आहे.
अरे वा! आता तुम्ही देखील घेऊ शकता 1 कोटीचे घर, फक्त वापरा ही ट्रिक, येथे क्लिक करून पहा बातमी..
दसऱ्याला शेकडो फ्लॅटची झाली विक्री
दसरा सणाच्या मुहूर्तावर नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील प्रॉपर्टीला खूपच प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे दक्षिण नवी मुंबईमधील घरांना ग्राहकांकडून जास्त पसंती दिल्याचे विकासक सांगत आहे. सध्या दक्षिण नवी मुंबईमधील घरे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे कर्जत, रोहा, खोपोली माणगाव, अलिबाग, पेण या विभागामधील मोकळ्या असलेल्या भूखंडांना, लक्झरी फ्लॅटला (Luxury Flats) पसंती दिसून येत आहे. – प्रभाकर पवार, प्रॉपर्टी कन्सल्टंट.