सिडकोची पुढील महिन्यात 3500 घरांची सोडत? आता सामान्यांना घर मिळणार? पहा महत्वाची अपडेट..!

Navi Mumbai : सिडकोच्या नव्या घरांची सोडत (Cidco Lottery) येत्या नव्या वर्षामध्ये काढली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 26 जानेवारीच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या नोडमधील 3 हजार 500 एवढ्या घरांची सोडत काढण्याचा निर्णय संबधित विभागाकडून घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे गेल्या वर्षभरापासून असलेली सर्वसामान्य लोकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सिडकोकडून पंतप्रधान आवास योजनेच्याअंतर्गत 87 हजार एवढी घरे बांधण्यात येत आहेत. यातील 25 हजार एवढी घरांचे बांधकाम होऊन त्यांचे यशस्वीपणे वाटप झालेले आहे. आणि येत्या चार वर्षांमध्ये उर्वरित असलेली 67 हजार एवढी घरे बांधण्याची सिडकोची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. 

अरे वा! नव्या वर्षात म्हाडाची 1600 घरांसाठी लॉटरी; जानेवारीत होणार जाहिरात प्रसिद्ध, येथे क्लिक करून पहा कुठे असणार घरे?

विशेष म्हणजे आता जवळपास 3 हजार 500 एवढ्या घरांची सोडत पुढील महिन्यात म्हणजेच नवीन वर्षात 26 जानेवारी रोजी काढण्याची योजना संबंधित विभागाकडून तयार करण्यात आल्याचे समजते. सिडकोकडून गेल्या दिवाळीला पंतप्रधान आवास योजनेमधील घरांची शेवटची सोडत काढण्यात आली होती. सिडकोची ही घरे खारकोपर (Cidco Flats Kharkopar) तसेच बामणडोंगरी रेल्वेस्थानक परिसरामध्ये आहेत. 

काय सांगता! आता मुंबईतील या 30 हजार लोकांना मिळणार म्हाडाची घरे, येथे क्लिक करून पहा बातमी..

सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत महत्वाचा निर्णय

सिडकोच्या या गृह प्रकल्पामधील घरांच्या किंमती खासगी विकासकांपेक्षा जास्त असल्याचा तक्रारी ग्राहकांकडून ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे आता या घरांच्या किमती कमी करण्याचा महत्वाचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. पण गेल्या आठ महिन्यांपासून या महत्त्वाच्या प्रस्तावावर काहीच कार्यवाही झालेली नसल्याने या योजनेमधील यशस्वी अर्जदारांना घरांचे वाटपपत्र देण्यात आलेले नाही. या कारणामूळे गेल्या वर्षभरामध्ये सिडकोकडून घरांची नवीन योजना (Cidco Housing Scheme) काढण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे. अशी परिस्थिती असली तरी नवीन वर्षामध्ये 3 हजार 500 घरांची सोडत (Cidco Lottery Navi Mumbai) काढण्याच्या हालचाली सिडकोकडून सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

Leave a Comment