सावध व्हा! चुकूनही विकत घेऊ नका अशी प्रॉपर्टी, अन्यथा वाढतील अडचणी..!

Property News : आजकाल अलिशान घरांचा ट्रेंड सुरू आहे. आज प्रत्येकालाच आपल्याकडे अलिशान घर असावं असं वाटतं असते, पण अलीकडच्या काळात घरांच्या किंमती वाढल्याने सामान्य माणसाकडे तेवढे बजेट नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांना भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. मुंबई पुण्यात तर घराचे (1 bhk flat Mumbai) भाव कोटीत आहे. त्यामूळे काही लोकांना संपूर्ण आयुष्यभर कमावलेली कमाई घर विकत घेण्यासाठी खर्च करावी लागते. तसेच काही लोक होम लोन (Home Loan) घेऊन घर विकत घेतात आणि आपले स्वप्न पूर्ण करतात. पण घर विकत घेताना तुम्हाला सावध राहणे आवश्यक आहे. जर तुम्ही घर विकत घेत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे, अन्यथा, तुमचे मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते.

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

घर खरेदी करताना हे लक्षात ठेवा..

(1) चुकूनही खरेदी करू नका अशी जमीन : तुम्ही फ्लॅट किंवा घर विकत घेत असाल, तर नेहमी पुष्टी केलेली रजिस्ट्री तपासणे आवश्यक आहे. जर कोणत्याही घरामध्ये ते नसेल तर चुकून देखील अशा प्रकारची जमीन खरेदी करू नका, कारण यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात.

बाप रे! एका अटीमुळे म्हाडाची घरे मिळण्यास अडचण; सरसकट घरे देण्याची मागणी..!

(2) जर तुम्ही घर विकत घेत असाल तर तुम्ही टायटल सर्टिफिकेटकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या प्रमाणपत्रामूळे मालमत्तेची (Property) साखळी विकसित झाली की नाही आणि मालमत्तेचे टायटल प्रत्यक्षात विकासकाकडे आहे की नाही हे समजते. म्हणून हे नक्की तपासले पाहिजे…

(3) घर खरेदी करत असताना स्थानिक प्राधिकरणाच्या योजनेच्यानुसार घर बांधण्यात आले आहे की नाही हे सुद्धा पहावे लागेल. प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आलेल्या नकाशाशिवाय घर बांधले गेले तर भविष्यामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

(4) जमिनीची परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय ती जमीन विकत घेऊ नका. तसेच, मालमत्तेचे बाजार मूल्य (Property Market rate) माहिती करून घ्या, जेणेकरून कमी किमतीची मालमत्ता महागड्या किमतीत विकत घेऊन तुमची फसवणूक होणार नाही.

Leave a Comment