अरे वा! दिवाळीनिमित्त या बॅंकाकडून स्वस्तात होम लोन घेऊन करा घराचे स्वप्न पूर्ण; पहा काय आहे ऑफर?

Home Loan Offers : दिवाळीच्या सणाच्या खास मुहूर्तावर देशामधील 3 मोठ्या बँकांकडून होम लोनवर खास ऑफर (Home Loan Offers) आणण्यात आल्या आहेत. देशात गेल्या दिवसांपासून सणासुदीचा हंगाम सुरू झालेला आहे. आता काही दिवसांवर दिवाळी, भाऊबीज सारखे मोठे सण येऊन ठेपले आहेत. दिवाळी आणि भाऊबीज या सणांना विशेष महत्व असून या काळामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर घरे खरेदी करतात. सध्या सुरू असलेला सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन मुंबईत देखील टू बीएचके घरांची (2 bhk flat Mumbai) जोरदार खरेदी होताना दिसत आहे. हे लक्षात घेऊन बँका देखील घर खरेदीदारांसाठी होम लोनवर जोरदार ऑफर (Home Loan Offers) आणल्या आहेत.

तुम्हाला जर घर खरेदी करायचे असेल तर आता तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते. कारण देशातील मोठ मोठ्या बँकांनी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर होम लोनवर ऑफर (Home Loan Offers) आणल्या आहेत. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक तसेच बँक ऑफ बडोदासारख्या मोठ्या बँकांच्या नावांचा समावेश आहे. बॅंकांकडून मिळत असलेल्या या ऑफरचा लाभ कधीपर्यंत घेऊ शकता याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. या सर्व बँकांकडून दिवाळी 2023 मध्ये होम लोनवर सणाच्या ऑफर सुरू केल्या आहेत.

म्हाडाचे घर पाहिजे? म्हाडा सोडतीतील एवढी घरे अखेर रिक्त राहणार! पहा या घरांसाठी कधी करता येणार अर्ज? येथे क्लिक करून पहा बातमी..

होम लोनवर या बॅंकांनी आणल्या ऑफर (Home Loan Offers)

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्त साधून स्टेट बँक ऑफ इंडियाकडून खास सण ऑफर आणण्यात आली आहे. बँकेची ही विशेष ऑफर 1 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान असणार आहे. एसबीआय बँक (SBI Bank) या विशेष मोहिमेच्या माध्यमातून ग्राहकांना व्याजदरामध्ये मोठ्या प्रमाणावर सूट देत आहे.

खुशखबर! म्हाडाच्या या घरांची 70 टक्के दुरुस्ती पूर्ण; दिवाळीनंतर एवढ्या लोकांना मिळणार घराची चावी, येथे क्लिक करून पहा बातमी..

पंजाब नॅशनल बँकेकडून सुद्धा 2023 मध्ये आपल्या ग्राहकांसाठी होम लोनवर जोरदार ऑफर (Best Home Loan Offers) देण्यात येत आहे. जर तुम्ही दिवाळी सणाच्या काळात बँकेकडून होम लोन घेतले तर बँक 8.40 टक्के या दराने होम लोन देत आहे.

तसेच प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्रांवर देखील बँकेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाहीये. होम लोन मिळविण्यासाठी, तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही 1800 1800/1800 2021 या टोल फ्री नंबर वर कॉल करून देखील माहिती मिळवू शकता.

काय सांगता! आता म्हाडाचे घर विकण्यासाठी खासगी कंपनी मैदानात; आता घरांच्या किमतीत झाला मोठा बदल, येथे क्लिक करून पहा बातमी..

बँक ऑफ बडोदाकडून दिवाळी सणानिमित्त ‘फीलिंग ऑफ फेस्टिव्हल विथ बीओबी’ या नावाची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मोहीम 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. या फेस्टिव्हल ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना सुरुवातीला 8.40 टक्के या दराने होम लोन देण्यात येत आहे. तसेच बँकने शून्य प्रक्रिया शुल्क ठेवली आहे.

Leave a Comment