आता मुंबईत घरांच्या किंमती कमी होणार? पहा घरांच्या किंमतीबाबत आली मोठी बातमी..!

1 bhk flat Mumbai : मुंबईमध्ये इमारत बांधकामापोटी शासन आणि वेगवेगळ्या नियोजन प्राधिकरणाला भराव्या लागत असणार्‍या चटईक्षेत्रफळ अधिमूल्यामध्ये 50 टक्के एवढी कपात केली जावू शकते अशी दाट शक्यता आहे. विकासकांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अशा मागणीला गृहनिर्माण मंत्र्यांनी स्वतः अनुकूलता दर्शवली आहे. आता लवकरच याबाबत प्रशासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु घरांच्या ज्या काही किमती असतील त्या कमी करून याचा लाभ थेट खरेदीधारकाला होणार असेल तरच ही सवलत द्यावी. असे मत नगर विकास विभागाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे समजले आहे.(ready to move flats)

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री यासोबत कन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन (एमसीएचआय-क्रेडाई) यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये गृहनिर्माण मंत्र्यांनी याबाबत घोषणा केली होती. गृहनिर्माण विभाग अंतर्गत असा प्रस्ताव नगरी विकास विभागाला पाठवला जाणार आहे. चटईक्षेत्रफळ (एफएसआय) अधिमूल्यामध्ये विकासकांनी सरसकट 50% कपातीची मागणी केली आहे (low price flat in mumbai). परंतु त्या ऐवजी काही प्रमाणामध्ये सवलत मिळेल. याविषयी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळाली.

म्हाडाचे घर पाहिजे? म्हाडा सोडतीतील एवढी घरे अखेर रिक्त राहणार! पहा या घरांसाठी कधी करता येणार अर्ज? येथे क्लिक करून पहा बातमी..

अतिरिक्त आशा चटईक्षेत्रफळापोटी भरावी लागणारी जी काही अधिमूल्य असतील ती अव्वाच्या सव्वा असल्याची ओरड सतत विकासकांच्या माध्यमातून केली जाता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये कोरोनाचे कारण पुढे केले होते. अशावेळी चटईक्षेत्रफळ अधिमुल्यमध्ये 50% इतकी सवलत जाहीर झाली. अशावेळी त्याचा फायदा घर खरेदी धारकांचे मुद्रांक शुल्क पूर्णपणे विकासकांनी भरावेत असे आदेश प्रशासनाने दिले होते. मुद्रांक शुल्कची रक्कम भरली आहे की नाही याविषयीची यादी सादर केल्यानंतरच पुढे उपनिबंधकांनी करारनामीची नोंद करून घ्यावी असे सुद्धा स्पष्ट केले. आता पुन्हा एकदा विकासाकांच्या माध्यमातून अधिमूल्य मध्ये कपात करण्याची मागणी पुढे ढकली जात आहे. भरमसाठ असे चटईक्षेत्र अधिमूल्य भरावे लागत असल्यामुळे घरांच्या किमतीमध्ये आणखी वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. असे म्हणणे विकासकांनी व्यक्त केले.

खुशखबर! म्हाडाच्या या घरांची 70 टक्के दुरुस्ती पूर्ण; दिवाळीनंतर एवढ्या लोकांना मिळणार घराची चावी, येथे क्लिक करून पहा बातमी..

मुंबईमध्ये पुनर्विकासात प्रत्यक्षपणे विकासकाला प्रति चौरस फुटा साठी 20 ते 22 हजार रुपये मोजावे लागत आहेत. यामध्ये आता बाजाराच्या माध्यमातून किंवा बँक तसेच बँकेतर घेतलेले जे काही कर्ज असेल तसेच त्यावरील व्याज असेल याचाही अंतर्भाव होत आहे. फक्त अधिमुल्याच्या पोटी 10 ते 12 हजार रुपये इतकी रक्कम प्रति चौरस फुटा साठी अदा करावि लागत आहे. विकासकांना मुंबईमध्ये विविध प्रकारचे एकूण 32 अधिमूल्य भरावे लागत आहेत. यामुळे आता एकूण प्रकल्प खर्च आहे त्याच्या 30 टक्के खर्च हा अधिमूल्यपोटी सोसावा लागेल. त्यामध्ये आता कपात झाली तर घराच्या किमतीमध्ये (low price flat in mumbai) सुद्धा काही प्रमाणामध्ये घट होईल. असा विकासकांचा दावा आहे.

काय सांगता! आता म्हाडाचे घर विकण्यासाठी खासगी कंपनी मैदानात; आता घरांच्या किमतीत झाला मोठा बदल, येथे क्लिक करून पहा बातमी..

प्रशासनाने अधिमुल्यामध्ये कपात केलीच तर अशावेळी घरांच्या किमती विकासक कमी करतील का? या प्रक्रियेवर प्रशासन नियंत्रण कसे ठेवणार? असे प्रश्न मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी स्वतः उपस्थित केले.

Leave a Comment