बिल्डरने बँकेतून उपलब्ध करून दिलेल्या गृह कर्जाचे फायदे व तोटे; पहा कामाची बातमी…

home loan: गृह कर्जाची सुविधा ग्राहकांना वेळोवेळी दिल्यामुळे ग्राहक खुश होतात. तसेच ग्राहकाला अगदी विना विलंब, विना त्रास कर्ज उपलब्ध करून देता आल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा यातून समाधान मिळते.

बिल्डरने उपलब्ध करून दिलेल्या गृह कर्जाचे फायदे तसेच तोटे;

ग्राहकांना अगदी मनासारखे घर मिळाले, घरासाठी लागणारे बजेट देखील फिक्स झाले, घराच्या निवडीच्या बाबी संपूर्ण झाल्या, त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला नक्की कोणती बँक गृह कर्ज देईल? त्या बँकेने दिलेल्या कर्जाची टक्केवारी नक्की किती असेल? आपल्याला हवे तितके कर्ज मिळेल की नाही? (Best home loan India) ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याकरिता सर्वसाधारणपणे किती दिवस जातील? या सर्व बाबींसाठी बिल्डर काय मदत करेल? अशा विविध शंका निर्माण होतात…

कोणत्या गृहप्रकल्पामध्ये घर उपलब्ध करून घ्यायचे? हे ठरवणे जितके कठीण आहे त्यापेक्षाही कठीण काम गृह कर्ज कोणत्या बँके मधून उपलब्ध करणे हे आहे. आतापर्यंत अनेक लोकांना याचा अनुभव आला असेल (home loan update). परंतु गृह कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी आपली धावपळ होऊ नये, तसेच विविध बँकांना या कारणास्तव भेट द्याव्या लागू नयेत, प्रत्येक बँकांच्या ज्या काही प्रक्रिया असतील त्या समजावून घेण्यास धावपळ होऊ नये, यासोबतच गृह कर्जाची प्रक्रिया अगदी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी बांधकाम व्यवसायिक त्यांचा जो काही प्रकल्प असेल त्याच्या ठिकाणी बँकांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करत आहेत. तसेच घर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत.

त्यामुळे घर खरेदी करण्याची जी काही प्रक्रिया असेल ती ग्राहकांसाठी खूपच सोपी होईल. यासोबतच ग्राहकाला एकाच ठिकाणी विविध बँकांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना गृह कर्जाचा निर्णय घेणे सोयीस्कर होईल. ग्राहकांना विना विलंब विना त्रास देता कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. याचे समाधान सर्व बांधकाम व्यवसायिकांना मिळते गृह कर्जाच्या विविध सुविधांमुळे ग्राहक सुद्धा खुश होतात.

बाप रे! घर खरेदी केल्यानंतर फक्त रजिस्टर झालं म्हणून निवांत राहू नका; इथे पण करा नोंद.. अन्यथा होईल फसवणूक.. !

गृह कर्ज उपलब्ध करून देण्यामध्ये बांधकाम व्यवसायिकांचा असा सुद्धा फायदा आहे की, त्यांना पुढील बांधकामासाठी अगदी त्वरित पैसे उपलब्ध होत आहेत. यासोबतच एकदा गृह कर्ज फिक्स झाले की संबंधित फ्लॅट विकला जातो व त्यांना उर्वरित घराच्या विक्रीवर अगदी बिनधास्तपणे लक्ष केंद्रित करता येते. गृह कर्जाची सुविधा बांधकाम व्यवसायिकांनी त्यांच्या माध्यमातूनच उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाचा वेळ तसेच श्रम या ठिकाणी वाचत आहे. परंतु त्या मागील व्यावसायिकांचा सुद्धा मोठा फायदा आहे. ग्राहक तसेच बांधकाम व्यवसायिक यांना बिल्डरच्या माध्यमातून जे काही गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते याचा फायदा तसेच तोटा काय होतो? त्यासाठी विशिष्ट बाबी तपासायला हव्यात. याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.

30 लाखात घेतलेले घर 50 मध्ये विकण्याची इच्छा ? तर मग याठिकाणी मिळणार मोठी संधी..

बांधकाम व्यावसायिकामार्फत गृहकर्ज उपलब्ध करून घेण्याचे फायदे:

१) वेळ आणि कष्टाची बचत:

गृह कर्ज उपलब्ध करून घेत असताना खरेदी करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे तसेच बांधकाम व्यावसायिकाचे विविध कागदपत्रे बँकेमध्ये सादर करावे लागतात. अनेक प्रक्रिया तसेच विविध कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर गृह कर्ज या ठिकाणी मंजूर होते. या सर्व प्रक्रियेमध्ये मोठा वेळ जाण्याची दाट शक्यता असते. ग्राहकांची धावपळ सुद्धा या ठिकाणी होते. अशी बरीचशी प्रक्रिया झाल्यानंतर बँकेने गृह कर्ज काही कारणास्तव नाकारले तर असा अनुभव कित्येक लोकांना आला आहे. त्यामुळे अशा निराशा जन्य परिस्थितीत गृह कर्ज मंजूर न झाल्यामुळे टोकन दिलेले जे काही रक्कम असेल ती परत घेण्याची वेळ कित्येक नागरिकांवर येते. परंतु बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून गृह कर्ज उपलब्ध होत असताना जितके पाहिजे तितके कर्ज मिळण्यास ग्राहक पात्र असतील तर गृह कर्जाची प्रक्रिया अगदी यशस्वीरित्या काही दिवसातच पार पडते.

मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याच्या कालावधीत मोठा बदल;

२) बँकेच्या विविध ऑफरचा फायदा मिळतो:

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यासोबतच घर खरेदीची प्रक्रिया अगदी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बांधकाम व्यावसायिक सुद्धा विविध ऑफर देतात. अशाच ऑफर बँका सुद्धा देत आहेत. गृह कर्जाचा अगदी कमी व्याजदर तसेच गृह कर्जासाठी आकारण्यात आलेल्या ज्या काही प्रक्रिया शुल्क असतील त्या सुद्धा माफ केल्या जातात. आठ दिवसाच्या आत कर्ज मंजुरी. अशा विविध प्रकारच्या सवलती ग्राहकांना मिळतात. म्हणजेच काही बँका या सवलती त्यांच्या शाखेमध्ये उपलब्ध करून देतात. परंतु प्रत्येक घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला याची माहिती होईलच असे पण नाही. परंतु बांधकाम व्यवसायिकांच्या माध्यमातून बँका सुद्धा या सुविधा देत असतील तर ग्राहकांना या सर्व ऑफर्सची जी काही माहिती असेल ती सहज उपलब्ध होते.

खुशखबर! आता घर खरेदी करा आणि मिळवा ‘हे’ फायदे.. ही चांगली संधी गमावू नका..

३) अल्पावधीत मिळते कर्ज:

आपल्याला जितके पाहिजे तितके कर्ज मंजूर झाले असेल तर अशी गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत होईल असे काही नाही. कधी कधी जे काही कर्ज असेल ते मिळण्याची प्रक्रिया दीड ते दोन महिन्यांपर्यंत वाढते किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये बांधकाम व्यवसायिकांना तसेच घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला कर्ज मिळण्याची वाटच बघावि लागते. परंतु ही सर्व प्रक्रिया जर बांधकाम व्यवसायिकांच्या मार्फत पार पडत असेल तर कर्ज मिळण्याला कोणताही विलंब लागत नाही. त्यामुळे घर खरेदी करण्याची प्रक्रिया लांबत नाही.

४) कायदेशीर बाबींची पूर्तता होते:

गृह कर्जाचे जे काही प्रकरण असेल त्यामध्ये कागदपत्रांचा मोठा वाटा आहे. कर्जदार तसेच बांधकाम व्यवसायिक यांचे दोघांचेही सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केल्याशिवाय प्रकरण पुढे जाऊच शकत नाही. अशावेळी दोघे सुद्धा एकाच ठिकाणी असल्यामुळे कर्जाची प्रक्रिया अगदी सुलभ होते.

५) ठराविक बँकेतूनच कर्ज उपलब्ध करून घेणे बंधनकारक नसते:

बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून काही विशिष्ट बँकांमधूनच कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे त्याच बँकेच्या माध्यमातून गृह कर्ज घेणे बंधनकारक केल्यामुळे ग्राहकांचे अडचणी या ठिकाणी होऊ शकते. कारण की ग्राहकाचे इतर बँकांशी काही सुद्धा संबंध असतील तर त्याला बँकांपेक्षा इतर चांगली ऑफर देता येते. परंतु बांधकाम व्यवसायिकांनी जे काही गृह कर्ज ठरवले असेल तर त्यांनी सांगितलेल्या बँकेच्या माध्यमातूनच गृह कर्ज घेणे बंधनकारक असते. त्यामुळे ग्राहकांना अडचण निर्माण होते.

बिल्डरकडून गृहकर्ज घेताना या आवश्यक बाबी तपासा:

– कर्ज उपलब्ध करून घेत असताना बँकांनी विविध अटी टाकलेल्या आहेत का? ज्याचा बांधकाम व्यवसायिकांना चांगलाच फायदा होऊ शकतो. तसेच बिल्डराने कागदपत्रांची व्यवस्थितपणे पूर्तता केली आहे की नाही याची सुद्धा तपासणी करावी.

– नियमित व्याजदर असतो त्याच्यापेक्षा जास्त व्याजदर ग्राहकाला अजिबात आकारता येत नाही.

– बांधकाम व्यवसायिकांनी कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी काही विशिष्ट अटींचा भंग केला आहे का? तपासून घ्यावे.

– बांधकाम प्रकल्पासाठी व्यवसायिकांनी जे काही कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करण्यासाठी आपल्या घराचा काही गैरवापर केलेला आहे का? याची तपासणी करावी.

– कर्जाचा हप्ता कधी असणार आहे? तसेच त्याचे व्याजदर किती असेल? यासोबतच कर्जाचा जो काही कालावधी असेल तो तपासून घ्यावा.

– शंका असलेल्या बाबींची बँक यासोबतच बांधकाम व्यवसाय अशा दोघांकडून व्यवस्थित रित्या खात्री करावी.

– कर्जदार व्यक्ती मासिक हप्ता भरत नसल्यामुळे त्यांच्याकडून काही विशिष्ट शुल्क आकारले जातात. त्याचे खाते डिफॉल्टर म्हणून फिक्स होते. तसेच बँकेला यावर कोणतेही कारवाई करता येते आणि अशावेळी जास्तीचे पैसे खर्च होतात. त्यासाठी ग्राहकांकडून याचे शुल्क आकारले जातात.

– कोणत्याही बँक तसेच वित्तीय संस्था ग्राहकांना कर्ज देण्याकरिता विविध कागदपत्रांची पडताळणी या ठिकाणी करावी लागते. यासोबतच मालमत्तेचे मूल्यांकन सुद्धा होते. अशा गरजा पूर्ण करण्यासाठी बँक अगदी कायद्याप्रमाणे नियुक्ती करते. याचे जे काही पैसे असतील ते कोण भरणार आहे हे विचारावे.

– तुमचे कर्ज मंजूर झाल्यानंतर लॉगिन फी तुमच्या प्रोसेसिंग फी च्या माध्यमातून कापली जाते. तर कर्ज मंजूर झाले नसेल तर लॉगिन शुल्क तुम्हाला परत मिळणार आहेत की नाही याची तपासणी करून घ्यावी.

– गृह कर्जाचे जे काही छोटे शुल्क असतील ते प्रत्येक बँकेप्रमाणे वेगवेगळे असतात. अशा विविध शुल्कांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment