मुंबईकरांसाठी! शेवटची संधी; आता म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी उरले फक्त एवढे दिवस, लवकर करा अर्ज..!

1 BHK Mhada Flats Mumbai : मुंबईत हक्काचे घर असणार्‍यांचा विषय काही वेगळाच असतो. कारण सध्याच्या काळात मुंबईत घर घेणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईत घरासाठी कोटी रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात. याच कारणामुळे संपूर्ण देशभरात मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटची (Real Estate Mumbai) चर्चा होताना दिसते.

1 BHK Mhada Flats Mumbai

मुंबईत घरे (2 BHK flats Mumbai) महाग असताना देखील मुंबईत एक घर तरी पाहिजेच असं अनेकांना वाटतं. मग त्यासाठी आयुष्यभर मेहनत करून कमावलेला पैसा खर्च करण्याची तयारीही अनेकांची असते. पण आता मुंबईत सरकारी योजनेंतर्गत घर मिळत असल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. सरकार म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात म्हाडाचे घर (Affordable Mhada Flats) उपलब्ध करून देत आहे. आता तुम्ही मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी अर्ज देखील करू शकता. महत्त्वाचं म्हणजे यासाठी फक्त काही दिवस शिल्लक उरले आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार; घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा बातमी..

आता तुम्हाला मुंबईत म्हाडाचे 1 बीएचके घर (Mhada 1 BHK Flat Mumbai) घेण्याची संधी मिळत असून त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मुंबईत म्हाडाचे घर घ्यायचे असेल तर लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. म्हाडाच्या घरासाठी अर्ज प्रक्रिया तुम्हाला https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन पूर्ण करावी लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? आणि घराचे लोकेशन कुठे आहे? याबद्दल माहिती जाणून घेऊया..

मुंबईकरांनो! संधी सोडू नका; ज्यांच्याकडे हक्काचं घर नाही अशा लोकांसाठी अल्पदरात घरं, येथे क्लिक करून पहा बातमी..

घराचे लोकेशन, किंमत आणि अर्जासाठी शेवटची तारीख (Mhada Flats Location)

म्हाडा आणि चट्टा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यामध्ये असलेल्या वांगणी याठिकाणी चड्डा रेसिडेन्सी या गृहनिर्माण प्रकल्पातील 2 हजार एवढ्या वन BHK घरांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी तसेच अर्ज सादर 20 जानेवारी पर्यंत करू शकता. येथे 155 एकरावर सात मजल्याच्या 133 इमारतींच्या मोठ्या प्रकल्पाचे काम होत असून यातून जवळपास 25 हजार घरे उभारली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात 8 हजारापेक्षा जास्त घरांचे काम होत असून वन बीएचके घरे बांधण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घराची किंमत 16 लाख 80 हजार रुपये अशी आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

Leave a Comment