काय सांगता! म्हाडाच्या या घरांना प्रतिसाद वाढला; या स्वस्त घरांसाठी लवकर करा अर्ज, मिळेल कमी किमतीत घर..!

मुंबई : सध्या मुंबईत घरांच्या किंमती खूपच झपाट्याने वाढल्याने सामान्य माणसाला मुंबईत घर (Flats in Mumbai) घेणे कठीण झाले आहे. पण म्हाडाकडून मुंबईत परवडणाऱ्या दरात घर (Affordable Mhada Flats Mumbai) दिले जात आहे. त्यामुळे आता सामान्य माणसाला सुद्धा मुंबईत आपले हक्काचे घर खरेदी करणे शक्य झाले आहे. आतापर्यंत म्हाडाने लॉटरी काढून अनेकांना हक्काची घरे दिली आहेत. आता देखील तुम्ही म्हाडाच्या घरासाठी (Mhada Flats Mumbai) अर्ज करू शकता.

Mhada Flats Mumbai

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळीज येथील गृह प्रकल्पामधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेमधील 2 हजार 278 एवढ्या घरांसाठी आता चांगलाच प्रतिसाद वाढताना दिसत आहे. सूर्या पाणीपुरवठा योजनेमधील पाणी म्हाडा कोकण मंडळाच्या या प्रकल्पाला उपलब्ध झाल्यामूळे या घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत म्हाडाच्या या घरांसाठी 1 हजार 60 एवढ्या इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यातील 691 अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.

मुंबईकरांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट; म्हाडा संदर्भात सरकारची मोठी घोषणा, येथे क्लिक करून पहा बातमी..

विरार-बोळीज येथील 2 हजारांपेक्षा जास्त घरे बर्‍याचदा सोडत काढून देखील विकली नसल्याने कोकण मंडळाकडून या घरांचा समावेश ‘प्रथम प्राधान्य’ योजनेमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घरांची विक्री करण्यासाठी रेडिओवर आणि लोकलमध्ये सुद्धा जाहिरात केली जात आहेत. तसेच फलकावरही जाहिरात करण्यात येत आहे. असे असताना सुद्धा या घरांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण आता या प्रकल्पामधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर या घरांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत या घरांसाठी एक हजारापेक्षा जास्त अर्जांची विक्री झाली आहे, या घरांसाठी जवळपास 1 हजार 60 एवढे अर्ज आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे यातील 691 अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केल्याची माहिती मिळाली आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

आता अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांना लवकरात लवकर तात्पुरते देकार पत्र देऊन त्यांच्याकडून घराची रक्कम भरून घेण्यात येणार आहे. या घरांसाठी अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया ही शेवटचे घर विक्री होईपर्यंत सुरू राहणार आहे. दुसर्‍या बाजूला नव्या धोरणानुसार विक्री न होता रिक्त राहिलेल्या घरांची (Mhada Flats) विक्री करण्यासंदर्भात पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये ही घरे विकली जाणार, असा विश्वास कोकण मंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सामान्यांना समृद्धीलगत नवनगरात म्हाडाची घरे मिळणार? समृद्धीलगत म्हाडाचे घर पाहिजे का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

Leave a Comment