काय सांगता! ही एक आयडिया घर खरेदी करताना वाचवेल लाखो रुपये, पहा आणि स्वतःचा फायदा करा..!

अलीकडच्या काळात जर तुम्ही घर किंवा फ्लॅट घ्यायचा विचार करत असाल तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपला पैशांचा बजेट पाहने खूप महत्वाचे असते. त्यासाठी आपल्या बजेटमध्ये घर (Budget Friendly Home) मिळावे यासाठी प्रतेकजण प्रयत्न करत असतो. कारण सध्याच्या काळात घरांच्या किमती (Flat Price) या गगनाला भिडल्या आहेत आणि त्यात पुन्हा अवघड गोष्ट म्हणजे तुम्हाला प्लॉट विकत घेऊन घर बांधायचे असेल तर मग तुम्हाला खूपच मोठी किंमत मोजावी लागू शकते. तसेच हे व्यवहार करत असताना तुम्हाला बर्‍याच प्रकारचे कर सुद्धा भरावे लागतात, त्यामुळे जास्त प्रमाणावर पैसा खर्च होतो.

बर्‍याच लोकांकडे घरांचा अशा प्रकारचा महागडा व्यवहार करण्यासाठी पैसा नसतो, त्यामुळे अनेक लोक होम लोन घेण्याचा विचार करतात किंवा इतर ठिकाणांहून पैशांची जुळवाजुळव केली जाते. यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असते. पण तुम्ही घर घेताना एक आयडिया जर वापरली तर तुम्हाला मोठा फायदा मिळणार आहे. ही आयडिया म्हणजे आपल्या पत्नीच्या नावावर घर घेणे.. पत्नीच्या नावावर घर घेतल्यास याचा तुम्हाला किती फायदा होईल? याची माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.

बाप रे! आता 40 लाखांच्या खाली घर खरेदी करणे अवघड होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

आपल्या देशात महिलांना विविध योजना, आरक्षण तसेच अजून बरेच लाभ दिले जातात. त्याच पद्धतीने महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास अतिरिक्त सोयी सवलती देण्यात येतात. त्यामुळे महिलांच्या नावे घर खरेदी केले तर काही पैशांची बचत आपल्याला करता येते. चला पाहूया महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यास कोणते फायदे मिळतात?

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? पहा कामाची माहिती..!

पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्यास मिळतील हे फायदे

(1) घर खरेदीवर करात सूट मिळते करा
(2) मुद्रांक शुल्क अर्थातच स्टॅम्प ड्युटीमध्ये सुट मिळते
(3) होम लोनच्या (Home Loan) व्याजामध्ये अतिरिक्त सूट मिळत असते

हे 3 फायदे पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्यानंतर मिळतात. याच्या माध्यमातून तुम्हाला लाखो रुपये वाचवता येऊ शकतात.

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

Leave a Comment