बाप रे! फक्त आठ महिन्यांत तब्बल 81 हजार मुंबईकरांनी घेतले हक्काचे घर, पहा कुठे आहे स्वस्त घरे?

2 BHK Flat Mumbai : मायानगरी मुंबईचे आकर्षण आजही सर्वांमध्ये कायम दिसून येते. येथे असलेले मोठ मोठे उद्योग, हॉस्पिटल, पर्यटनस्थळे, फिल्म इंडस्ट्री इत्यादीमुळे मुंबईत राहायला जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मुंबईत घरांच्या किंमती आकाशाला भिडत असल्या तरी मुंबईमध्ये घरे, फ्लॅट (2 BHK Flat Mumbai) विकत घेणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. अलीकडे म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे स्वस्त घरांच्या लॉटरी काढल्या जात असल्याने स्वस्तात फ्लॅट विकणार्‍या म्हाडाकडे अर्ज करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे (Cheap Mhada Flat Mumbai). आतपर्यंत म्हाडाने अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता.

सध्याच्या काळात मुंबईत घर घेण्याची लोकांमध्ये स्पर्धा दिसून येते. कारण मुंबईत स्वतःचे घर विकत घेणे म्हणजे मोठी गोष्ट समजली जाते. यंदाच्या चालू वर्षामध्ये मुंबईत आजपर्यंत एकूण 81 हजार 664 प्रॉपर्टीची विक्री झालेली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये मुंबईत एकूण 1 लाख 21 हजार एवढ्या प्रॉपर्टीची (Mumbai Property) विक्री झाली होती. पण त्या तुलनेत यंदा फक्त 8 महिन्यांमध्ये झालेली 81 हजारांहून जास्त प्रॉपर्टीच्या विक्रीची संख्या विचारात घेता यंदा या चालू वर्षामध्ये मुंबईत प्रॉपर्टी विक्रीचा उच्चांक गाठला जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

यामध्ये घरे आणि व्यावसायिक गाळे तसेच कार्यालयांचा समावेश आहे. गेल्या वर्षी (2022) मुंबईमध्ये झालेल्या घरांच्या विक्रीपैकी (Flat Sales Mumbai) सर्वात जास्त घरांची विक्री ही पश्चिम उपनगरामध्ये झाली होती.

ज्या ज्या घरांचे आकारमान हे 500 ते 1 हजार चौरस फूट असे आहे त्यांची किंमत 1 ते 2 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.. मुंबईत अशा घरांना ग्राहक सर्वात जास्त पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. आणि 1 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागा विकत घेणार्‍या ग्राहकांचे प्रमाण 16 टक्के एवढे होते. यावर्षी देखील ग्राहकांनी दोन बीएचके (2 BHK Flat) किंवा त्याच्या वरील घरांच्या खरेदीलाच पसंती दिली असल्याचं दिसतं. किमान 500 ते 1 हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

येथे वाचा – घर खरेदी करताना या 3 गोष्टी चेक करा; भविष्यात मिळू शकतो दुप्पट पैसा, येथे क्लिक करून वाचा बातमी..

विक्रीच्या वाढण्यामागे कारण काय?

मुंबई शहरामध्ये काही प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहे, त्यामुळे याचा फायदा विकासकांना झालेला दिसतो. विशेष म्हणजे मुंबई उपनगरात 2 मेट्रो सेवा (Metro Service) सुरू करण्यात आल्या आहेत. म्हणून पश्चिम उपनगराकडे खरेदी करणार्‍या ग्राहकांचा ओढा असल्याचे दिसून येते. 

सणासुदीमूळे झाला फायदा

मागील सलग 3 महिन्यांमध्ये मुंबईत 10 हजारांपेक्षा जास्त प्रॉपर्टीची विक्री झालेली आहे. येणार्‍या काळात असलेले सणासुदीचा काळ लक्षात घेता जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर मंडळीमार्फत आकर्षक योजना निर्माण केल्या जातील आणि याची परिणती प्रॉपर्टीची विक्री जास्त होण्याच्या रूपाने दिसून येईल…

येथे वाचा – आता करा म्हाडाच्या 5863 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज; मिळेल कमी पैशात हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

मुंबईत या भागात स्वस्त घरे (Cheap Flats Mumbai)

सोशल मीडिया वर मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत काही भागात स्वस्तात घरे (Cheap Flats Mumbai) उपलब्ध होतात. मुंबईतील हे ठिकाणे म्हणजे (1) बोरिवली, (2) घाटकोपर, (3) विक्रोळी, (4) कांदिवली, (5) मालाड, (6) कुर्ला, (7) चेंबूर, (8) पवई, (9) ऐरोली इत्यादि ठिकाणी..

येथे वाचा – संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment