सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न धोक्यात; पहा काय आहे कारण..

Real Estate : दिवसेंदिवस घरांची मागणी वेगाने वाढत असताना आपल्याला दिसत आहे. अशावेळी मागील तीन वर्षात (ऑक्टोबर २०२० ते ऑक्टोबर २०२३) भारतातील मोठ्या सात शहरांमधील प्रमुख ठिकाणी बांधण्यात आलेल्या घरांच्या किमतीमध्ये (Flat Price) लक्षणीय वाढ झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली. त्यामुळे मध्यमवर्गीयांना आपले स्वप्नातील घर (Dream Home) सातत्यात उतरवण्यास अडचणी येत आहेत.

देशभरात नवनवीन गृहप्रकल्प सध्या जोरात सुरू (Housing Project)

देशभरात नवनवीन गृह प्रकल्प सध्या जोरात सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळतील. या गृह प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नवीन घरांची (1BHK Flat) निर्मिती होत आहे. देशभरातील प्रमुख सात शहरांमधील मोक्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमती फक्त मागील तीन वर्षातच 13 ते 33 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. हे संपूर्ण निरीक्षण ”ॲनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टन्ट्स” यांनी नोंदवले आहे. मुंबई महानगर प्रदेशामध्ये 13 ते 27 टक्के पर्यंत दर वाढले आहेत. तसेच पुण्यात घरे (1BHK Flat Pune) महागली आहेत.

अरे वा! याठिकाणी फ्लॅटचे दर फक्त 15 लाखांपासून सुरू; येथे क्लिक करून पहा माहिती..

सात शहरांपैकी या भागात वाढले घरांचे भाव सर्वाधिक (High Flat Rates)

सात महत्त्वाच्या शहरांपैकी हैदराबाद शहरामधील गचीबोली भागात घरांचे भाव सर्वाधिक म्हणजे 33 टक्के वाढले. ऑक्टोंबर 2020 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत च्या कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणावर घरांच्या किमती वाढलेल्या आपल्याला दिसून आल्या. त्या पाठोपाठच कोंडापूर विभागात घरांचे दर 31 टक्क्यांनी महागले आहेत. गचीबोली या ठिकाणी ऑक्टोंबर महिन्यातच घरांची सरासरी किंमत ही 6,355 चौरस फूट इतकी होती. अशावेळी ऑक्टोंबर महिन्यातच 2020 मध्ये ही किंमत 4,790 रुपये प्रति चौरस फूट इतकी होती. हैदराबादच्या कोंडापूर विभागात यंदाच्या वर्षी घरांची किंमत ही 6,090 रुपये चौरस फूट एवढीच राहिली. याच कालावधीमध्ये 2020 मध्ये ही किंमत बघितली तर प्रति चौरस फूट 4,650 रुपये नोंदवली गेली. दक्षिण भारतामधील बेंगळुरू व्हाइटफिल्ड भागात 29 टक्क्यांची भाव वाढ पाहायला मिळाले. मागील महिन्यातच प्रती चौरस फूट 6,325 रुपये इतका भाव होता. जो ऑक्टोबर महिन्यामध्ये बघितला तर 4,900 रुपये एवढाच होता.

म्हाडा भाडे तत्वावर देणार फ्लॅट, गाळे; येथे क्लिक करून पहा कोणाला मिळणार लाभ?

मुंबई महानगर प्रदेशात झाली १३ ते २७ टक्के भाववाढ (Flat in Mumbai)

ॲनारॉकने याविषयी विस्तृत असा अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामध्ये बघितले तर मुंबई महानगर प्रदेशामधील महत्त्वाचे भाग, तसेच दिल्ली एनसीआर मधील महत्त्वाचे भाग येथील असलेल्या घरांच्या किमतीमध्ये 13 ते 27% वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले. पुण्यातही मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाल्याची दिसून आली. वाघोली परिसरात 25 टक्के भाव वाढ, हिंजवडी मध्ये 22 टक्के तर वाकड मध्ये 19 टक्क्यांनी घरांच्या किमती वाढल्या.

दिवसेंदिवस वाढत जाणारी मागणी तसेच घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाढलेले भाव, यामुळेच आघाडीच्या सात शहरांमध्ये घरांच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली – प्रशांत ठाकूर, प्रादेशिक संचालक व संशोधन प्रमुख, ॲनारॉक

मोठी संधी! मिळवा घर, प्लॉट, दुकान; सिडकोची लॉटरी जाहीर, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

पहा सरासरी भाववाढ किती? (प्रति चौरस फूट रु.)

१) हैदराबाद (गचीबोली)

ऑक्टो.२०२० – ४,७९० रु.
ऑक्टो.२०२३ – ६,३५५ रु.
वाढ (टक्के) – ३३%

२) कोंडापूर

ऑक्टो.२०२० – ४,६५० रु.
ऑक्टो.२०२३ – ६,०९० रु.
वाढ (टक्के) – ३१%

३) बेंगळुरू (व्हाइटफिल्ड)

ऑक्टो.२०२० – ४,९०० रु.
ऑक्टो.२०२३ – ६,३२५ रु.
वाढ (टक्के) – २९%

४) चेन्नई (पेरंमबूर)

ऑक्टो.२०२० – ६,२५० रु.
ऑक्टो.२०२३ – ७,१८० रु.
वाढ (टक्के) – १५%

५) कोलकाता (राजाहाट)

ऑक्टो.२०२० – ४,३६० रु.
ऑक्टो.२०२३ – ५,२०० रु.
वाढ (टक्के) – १९%

खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी मिळणार?

६) दिल्ली-एनसीआर (ग्रेटर नोएडा)

ऑक्टो.२०२० – ३,४५० रु.
ऑक्टो.२०२३ – ४,३८० रु.
वाढ (टक्के) – २७%

७) द्वारका एक्सप्रेसवे

ऑक्टो.२०२० – ५,३५९ रु.
ऑक्टो.२०२३ – ६,४१० रु.
वाढ (टक्के) – २०%

८) एमएमआर वरळी

ऑक्टो.२०२० – ३८,५६० रु.
ऑक्टो.२०२३ – ४३,७६० रु.
वाढ (टक्के) – १३%

९) लोअर परळ

ऑक्टो.२०२० – ३४,००० रु.
ऑक्टो.२०२३ – ४१,२९० रु.
वाढ (टक्के) – २१%

१०) अंधेरी

ऑक्टो.२०२० – २०,६०० रु.
ऑक्टो.२०२३ – २४,४६० रु.
वाढ (टक्के) – १९%

११) पुणे वाघोली

ऑक्टो.२०२० – ४,८२० रु.
ऑक्टो.२०२३ – ६,००५ रु.
वाढ (टक्के) – २५%

१२) हिंजवडी

ऑक्टो.२०२० – ५,५८० रु.
ऑक्टो.२०२३ – ६,८३५ रु.
वाढ (टक्के) – २२%

१३) वाकड

ऑक्टो.२०२० – ६,५७५ रु.
ऑक्टो.२०२३ – ७,७९५ रु.
वाढ (टक्के) – १९%

काय सांगता! म्हाडा विकणार कमी किमतीत 12 हजार घरं, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment