मुंबईत स्वस्त घर मिळणार; गोरेगाव येथे मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची घरे, पहा माहिती..!

1 bhk flat in Mumbai : बर्‍याच लोकांना मुंबई, पुण्यात स्वतःचे घर असावे असं वाटत असते पण हे सर्वांना शक्य होत नाही. घर घेण्यासाठी लागणारा पैसा प्रत्येकाकडे राहत नाही. त्यामूळे अनेक लोक हक्काच्या घरापासून वंचित राहतात. हे लक्षात घेऊन राज्य सरकार म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना घरे देण्याची योजना (Mhada Housing Scheme) राबवत आहे.

जर का तुम्हाला मुंबई सारख्या ठिकाणी म्हाडाचे स्वस्त घर (Mhada Flat Mumbai) घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण पहिल्या टप्प्यामध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे गोरेगावमध्ये (1 bhk flat in Mumbai) मध्यम वर्गाकरिता 227 घरे तर उच्च वर्गाकरिता 105 एवढी घरे तयार होत असून पहिल्यांदाच 35 मजली इमारतीसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी 27 मजली इमारत बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, 35 मजली इमारतीमध्ये मध्यमवर्गीयांसाठी 227 एवढी घरे असतील.

खुशखबर! आता मुंबईजवळ फक्त 10 लाखात घर; येथे क्लिक करून पहा ठाण्यातील सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती..

त्यासाठी चार 35 मजली इमारती प्रस्तावित करण्यात आलेल्या असून खासगी प्रकल्प म्हणून म्हाडा पहिल्यांदाच अत्याधुनिक सुविधा जसे की स्विमिंग पूल, जिम आणि गार्डन देण्यात येत आहे. दरम्यान, मंडळाकडून प्लॉट ए वर तीन 35 मजली इमारती वगळून खंड अ आणि ब 4,600 ऐवजी 3015 एवढ्या घरांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आणि त्यापैकी 2,683 एवढी घरे मार्च महिन्यात पूर्ण झाली आहेत. आणि यामधील 2,605 एवढ्या घरांचा गेल्या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला होता.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

मागील महिन्यामध्ये मुंबई मंडळाकडे 4,082 एवढ्या घरांसाठी 1,45,849 इतक्या लोकांनी नोंदणी केली. पण यापैकी 4 हजार लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे येत्या मुंबई विभागाच्या सोडतीमध्ये म्हाडा अजून घरे देण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना परवडेल अशी घरे (Affordable Flats Mumbai) देण्यासाठी सरकारने पहाडी गोरेगाव, बांगूर नगर आणि गोरेगाव पश्चिम याठिकाणी म्हाडाला 25 एकर एवढी जमीन दिली आहे. यामधील 18 एकर जागेवरती बांधकाम केले जाणार आहे.

खुशखबर! आता म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी या तारखेपर्यंत करू शकता अर्ज, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडा या 18 एकर जागेवरती जवळपास 5 हजार घरे बांधत आहे. मिळालेल्या माहितीनुसार म्हाडाच्या या 5 हजार घरांपैकी आतापर्यंत फक्त 2 हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीमध्ये या घरांचा समावेश करण्यात आला आहे. लोकांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी म्हाडाकडून संपूर्ण 25 एकर जागेवरती बांधकाम करणे आवश्यक आहे. या घरांचे काम बघता इमारतीचे काम डिसेंबर महिन्यात पूर्ण होऊ शकते. असे झाल्यास म्हाडा पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये सोडत काढू शकते असा अंदाज बांधण्यात येत आहे.

काय सांगता! महिलांना पुरुषांपेक्षा मिळते खूपच स्वस्त होम लोन, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment