काय सांगता! आता पुण्यात याठिकाणी मिळतायेत सर्वात स्वस्त घरे; पहा कुठे मिळेल स्वस्त घर..!

Affordable Flats Pune : पुणे शहराची ओळख फक्त शिक्षणाचे माहेर घर किंवा उद्योगनगरी एवढ्या पुरती सीमित राहिलेली नाही. तर संपूर्ण देशभरात आयटी हब म्हणून पुण्याची ओळख होत आहे. दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड विभागात स्थायिक होणाऱ्या नागरिकांचा आकडा वाढत चालल्याचा दिसत आहे. विशेष म्हणजे पुण्यात आपले घर (2 bhk flats Pune) असावे असं अनेकांना वाटत असते. त्यासाठी अनेकजण परवडणाऱ्या दरात घर (Affordable Flats Pune) मिळवण्यासाठी धडपड करत असतो.

Affordable Flats Pune

एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत आहे, तर दुसरीकडे जागे सोबतच घरांचे भाव अगदी गगनाला भिडले आहेत. यामुळे शहरापासूनच काही अंतरावर दूर असलेल्या मोशी च-होली परिसरामध्ये राहण्याचा नागरिकांचा कल वाढत आहे. या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प निर्माण झाले आहेत. तसेच अनेक प्रकल्पांचे काम अद्याप सुरू आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

नागरिकांकडून या गृह प्रकल्पांना (Housing Project) मोठा प्रतिसाद मिळत आहे. गृहप्रकल्पांसोबतच प्रश्नांकडून विविध विकास प्रकल्प प्रस्तावित असल्यामुळे छोट्या छोट्या गावांना जोडले जाणारे सुसज्ज रस्ते, तसेच काही दूर अंतरावर असणारे लोकप्रिय आळंदी देवस्थान, यामुळेच दिघी व च होली या ठिकाणी गृह प्रकल्प नव्याने साकारले जात आहेत. याशिवाय घरांच्या किमती त्या ठिकाणी आवाक्यात आहेत. त्यामुळे घरांची मागणी चांगली वाढत चालली आहे.

मुंबईत स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी; फक्त 10 लाखात 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

दिघी चहोली परिसराला काही वर्षांपूर्वी आऊटसाईड परिसर समजला जात होता. परंतु अलीकडील काही वर्षात हा परिसर अगदी झपाट्याने विकसित झाला आहे. नवनवीन रस्ते तयार झाल्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी वाढली गेली आहे. तसेच या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी नागरिकांची ओढ तितकीच वाढू लागली आहे. तसे बघितले तर या भागात सर्वात जास्त गृह प्रकल्प सध्या उभारले जात आहेत.

बाप रे! आता 40 लाखांच्या खाली फ्लॅट खरेदी करणे अवघड होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

विशेष भाग म्हणजे या ठिकाणी अगदी वन बीएचके फ्लॅट पासून फोर बीएचके फ्लॅट (4 bhk flats) उपलब्ध होत आहेत. गगनचुंबी इमारती या ठिकाणी उभ्या आहेत. त्यामुळेच सामान्य कामगारांपासून अगदी आयटी इंजिनिअर पर्यंत, तसेच शिक्षक वर्गापासून उद्योजकांपर्यंत अनेकांनी या ठिकाणी घरांसाठी पसंती दिली आहे.

काही प्रकल्प तर व्यापारी संकुलांसह निवासी स्वरूपातही तयार केले आहेत. त्यामुळे घर व दुकान अशी दुहेरी सोय येथे होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून विविध अशा रस्ते, पाणी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यामुळे उच्चभ्रू जीवनशैली नावारूपाला येत आहे.

संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

चिखली पासून मोशी पर्यंत तसेच मोशी पासून डुडुळगाव आळंदीपर्यंत जो देहू-आळंदी रस्ता आहे. त्या रस्त्यालगत नवे मार्केट उभे राहिले आहे. त्या ठिकाणी जीवन आवश्यक किरण मालाच्या दुकानांसह विविध फर्निचर मॉल्स जागोजागी उभा असलेले आपल्याला दिसतील.

फाटा पासून गावापर्यंत तसेच चोविसावाडी, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारे मळा, बुर्डेवस्ती अशा सर्वच भागात नव्याने इमारती उभ्या राहत आहेत. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल उपकरणाचे दुकाने देखील आपल्याला पाहायला मिळतील.

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

तसेच होम डेकोरेटर इंटेरियर डिझाईन, सौंदर्यप्रसाधने, कापड, सराफ, वाहनांचे सुटे भाग मिळणारी दुकाने या ठिकाणी उपलब्ध आहेत. खिडक्या, दरवाजे, ग्रील्स, पडदे अशी विविध प्रकारची सर्व साहित्य या विभागात मिळत आहेत. तसेच विविध नामांकित अशी शैक्षणिक संकुले देखील उभी राहिली आहेत.

या विभागात हॉटेल्स व उपहारगृहे सुद्धा आहेत, याशिवाय वन बीएचके पासून फोर बीएचके पर्यंतचे अगदी मनासारखे तसेच प्रत्येकाच्या बजेटमध्ये असलेली घरे येथे उपलब्ध आहेत. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून महापालिकेचे चहोली व बोऱ्हाडेवाडी मोशी या ठिकाणी गृहप्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Leave a Comment